२४ तास ३६५ दिवस दिवे का चालू ठेवतात ?

Categories Marathi
डॅलस दिवाळी

प्रगत देशात – अमाप वीज असते, पाण्याचं  नियोजन उत्तम असतं. आणि ते खरंच आहे. कधी लाईट गेलेत , लोड शेडींग आहे , नळ कोरडे आहेत किंवा अमुक वेळा पाणी जाणारे , कळशी भरून ठेवा असे ऐकले तरी नाही. मुळात इथे कळशी ‘वॉलमार्ट’ मध्ये मी तरी पाहिली नाही.

तर मुद्दा असा आहे , की इतकी सुबत्ता असताना या साऱ्या गोष्टी ‘काळजीपूर्वक वापराव्यात’ असलं वारं इथे वाहताना जाणवलं नाही.

२४ तास ३६५ दिवस दिवे का चालू ठेवतात ?

आमच्या अपार्टमेंट मधेच नाही तर सगळीकडेच दिवे बंदच करत नाहीत. आमच्या दाराबाहेर एक दिवा आहे, सगळ्याच दरांशेजारी आहे. तो चालूच आहे. मी लिझिंग ऑफिस मध्ये गेलो आणि तिथल्या ‘पोर्शा’ नावाच्या बाई ला म्हंटलं “दाराबाहेर एक दिवा आहे, त्याचे बटण काही घरी सापडलं नाही , तेव्हा ते कुठे आहे ते सांगावे”. मी तिच्याकडे ५०० डॉलर्स मागितल्यावर कसा चेहरा होईल तसा तिचा चेहरा झाला. ” कॉरिडॉर मध्ये लाईट असावा म्हणून ते आम्ही चालूच ठेवतो”

इथे फोटोत दिसेल – भर उजेडात , दुपारी ३ ला कशाला दिवे सुरु ठेवायचे ? सगळीकडचे – परत ‘ सगळीकडचे ‘ दिवे चालूच असतात. दुकान, ऑफिस , सजावट सगळं काही अव्याहत वीज वाया घालवत असतं. पंखे सुद्धा चालूच असतात. काही ऑफिसेस मध्ये सेन्सर्स आहेत, जिथे माणूस आला की लाईट लागतात (भारतात सुद्धा हे आहे).

आम्ही मात्र दिवाळीत देखील, बाल्कनीमधली दिव्यांची माळ रात्री ११ वाजले की बंद करत ‘वीज वाचवत होतो’

डॅलस दिवाळी