पेटपूजा

Categories Marathi
Marathi Travel Blog

 

स्वयंपाक करणे म्हणजे काय ‘थेरपी’ आहे म्हणाऱ्यांना नंतर भांडी घासावी लागत नाहीत बहुदा. मीठ, हळद आणि तेल उडवलेले ओट्यावरचे डाग यांना साफ करावे लागत नाहीत.

मात्र तेल तापेपर्यंत भारी मजा येते बरका . भाजी चिरणे, रेसिपीची उजळणी, एकंदर आपण कुकिंग शो मध्ये आहोत अशा अविर्भावानी मी सगळी तयारी करतो . एकदम चकाचक अरेजनमेंटच. कढईत तेल पडले आणि मोहरी तडतडली, की नुसती धावपळ ! काहीच जळू नये या भितीने कृती विसरून – सगळं कढईत जाईपर्यंत माझ्या ‘कृतींचे’ वर्णन ‘थैमान’ असे करता येईल. मीठ किती टाकायचे – याचे माप ‘अंदाजपंचे’ असल्याने – सगळेच पदार्थ गोड मानून खावे लागतात.

हुश्श !!! फोटोग्राफी बरी आहे – त्यामुळे इंस्टाग्राम किंवा व्हाट्सअँप साठी ‘टेस्टी फोटो’ काढण्यात आम्ही पटाईत! पहिला घास खाल्ला की ‘वाह वाह ‘ असे म्हणून मी पुढचं जेवण हळू हळू संपवतो ! लवकरच ‘आपण’ भांडी घासत असणार आहोत या विचारानी घास घशात अडकतो. बरं, चव कशीही असली तरी खाणार मीच , मग उगाच हे कमी आहे, ते कमी आहे वगैरे review घेतच नाही.

कूकिंग स्किल्स वर अविश्वास दाखवायचाच नाही , म्हणजे आपोआप पदार्थ ‘खाणेबल ‘ होतो!

#डॅलसकथा