उजवी खिडकी

Categories Marathi
डॅलस

वेळ संध्याकाळची. सूर्य अजून निवांत रेंगाळताच होता. इथे , म्हणजे डॅलस मध्ये, सूर्यास्त होतो ९ ला . सध्या, म्हणजे उन्हाळ्यात, ओह सॉरी समर – सो समर असल्याने खरोखर उकडतंय. घरी ए . सी. आहे मात्र बाहेर पडलं की पुण्यात आलो की काय..!? असंच उकडतंय!!! सांगत काय होतो, आणि गेलो कुठे !

संध्याकाळी बाहेर पडलो, काही वस्तू आणायच्या होत्या जवळच्या दुकानातून. एल रिओ ग्रान्दे – असे त्या स्टोर चं नाव … आपलं डी – मार्ट आहे ना, तसंच … इथे आल्यापासून लसणापर्यंत सगळं मिळतं!
मी इथे आल्यापासून पाहतोय – गाड्या चालवणारी लोकं,अर्थात वाहनचालक दिसत कशी नाहीत !? आणि हाच प्रश्न मला आज पुन्हा पडला…

रस्ता क्रॉस करणे इथे अत्यंत सोपं आहे, गाडीवाले चालणार्यांना *चालवणाऱ्यांना*मान वगैरे देतात, आपणहून थांबून जा वगैरे सांगतात – हे असं सवयीचं नाही हो ! आज क्रॉसिंग ला थांबलो होतो तेव्हाही पाहत होतो, माणूस (किंवा स्त्री – नंतर उगाच जेंडर बायस वगैरे नको आपल्याला ) दिसत कसा नाही! गाडी ‘ऑटोम्याटिक’ असू शकेलही , मात्र सगळयाच गाड्या नसणार !

काही वेळात कोडं सुटलं – इथे लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह आहे – आणि मी उजव्या खिडकीत पाहत होतो !